कोल्हापूर / ता. २०-प्रतिनिधी

आज कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिक सण व इतर धार्मिक कार्यक्रमासाठी घराबाहेर पडत आहेत. काही दिवसातच गणपती व गौरी हा सण येणार असून लोकांनी तो घरीच साजरा करावा . असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे पदार्थविज्ञान विभागाचे प्रा.डॉ.अण्णासाहेब मोहोळकर यांनी जनतेस केले आहे.
पुढे प्रा. मोहोळकर म्हणाले , भारतात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत . तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात देखील दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. त्यामुळे लोकांनी सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करून गरज असेल तरच घराबाहेर पडा. मास्क व सॅनिटायझर चा वापर करा. सध्या आपण एकमेकांना मेसेज, फोन करण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही.आपण सर्वजण आपल्या घरी आपल्या कुटुंबियांसमवेत आनंदी, सुखरूप व तंदुरुस्त राहा. आपण घरी बसून अगदी कंटाळला आहात परंतु सध्या तरी आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही . म्हणून घरी असताना घरातील वातावरण आनंदी ठेवा. घरी राहा, सुरक्षित राहा. असे आवाहन त्यांनी जनतेस केले आहे.