रामभक्तांसाठी सरकारचे होली अयोध्या अॅप सुरू

   अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाण्यासाठी देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येतील हॉटेलमध्ये बुकिंगही जोरात सुरू आहे. ऐनवेळी बुकिंगची गैरसोय होऊ नये, यासाठी होली अयोध्या अॅप सुरू करण्यात आले आहे. रामभक्तांसाठी या अॅपची निर्मिती करण्यात आले आहे. या अॅपमधून अयोध्येतील हॉटेल्समधील निवास आणि दरपत्रकाबाबतची माहिती मिळणार आहे. भक्तांच्या सोयीसाठी उत्तर प्रदेश सरकारने हे अॅप बनविले आहे. अयोध्या डेव्हलमेंट ॲथॉरटीने या अॅपची रचना तयार केली आहे. अँड्रॉईड युजर्ससाठीच हे अॅप उपलब्ध असणार आहे. अॅपल युजर्सना या अॅपसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. गुगल प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे. रूम बुक करण्यासाठी मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करावे लागणार आहे. २४ तास आधी रूम कॅन्सल करण्याची सुविधा आहे. यामुळे आपले पैसे परत मिळू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!