ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तीन दिवस काम बंद आंदोलन…

ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित असून वेळोवेळी निवेदन देऊन ही राज्य शासन या मागण्यांच्या कडे दुर्लक्ष करत आहे या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्या वतीने सर्वत्र आंदोलन सुरू असून दिनांक १८ ते २० डिसेंबर या तीन दिवसीय काम बंद आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी हातकणंगले पंचायत समिती येथे महाराष्ट् राज्य स्वाभिमानी कर्मचारी संघटनेच्या वतीने या विविध मागण्यांचे निवेदन हातकणंगले पंचायत समिती येथील कक्ष अधिकारी पी.के. मुरमुरे यांच्याकडे देण्यात आले.

    ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन लागु करणे ,भविष्य निर्वाह निधी  संघटनेकडे जमा करणे,जिल्हा परिषद कडील वर्ग ३ व ४च्या पदासाठी आरक्षण मर्यादा २० टक्के ठेवणे ,जिल्हा परिषद मधील गट क ची रिक्तपदे  भरताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भरणे,कलम ६१ रद्द करणे ,कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन लागू करणे, आदर्श ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पुरस्कार देणे आधी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तांदळे ,उपाध्यक्ष नेताजी पाटील , राजकुमार मिरजकर ,महिला राज्य अध्यक्षा हसिना मुल्ला शांतीनाथ धरणगुत्ते दगडू कदम भाऊसाहेब चौगुले राजेंद्र कुंडले विजय खाडे सागर उपाध्ये सह तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी कमर्चारी मोठ्या संखेने उपस्थित होते
error: Content is protected !!