छत्रपती शिवाजी महाराजांना खासदार धैर्यशील मानेंकडून अभिवादन

इचलकरंजी

गुरुवारी सायंकाळी महायुतीकडून उमेदवारी निश्चित झालेले खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी सकाळी इचलकरंजी शहरात भेट देऊन शिवतीर्थवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले रयतेचा राजा छत्रपतींच्या आशीर्वादाने लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात मी केली आहे अशी भावना धैर्यशील माने यांनी व्यक्त केली. त्यांचे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
बस स्थानक परिसरात असलेले रिक्षा चालक किरकोळ विक्रेते गजरे विक्रेते यांनी माने यांची भेट घेऊन पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत अशा भावना व्यक्त केल्या शहरात स्वागत करताना शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने शहराध्यक्ष भाऊसाहेब आवळे यांच्यासह पदाधिकारी महिला युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!