मतदार जनजागृती संदर्भात प्रांताधिकारी चौगुले यांचे मार्गदर्शन

इचलकरंजी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये केंद्रनिहाय मतदार जागृती पथक स्थापन करून सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी सूचना दिल्या. घोरपडे नाट्यगृहामध्ये झालेल्या या बैठकीत २५४ केंद्रनिहाय मतदार जागृती पथकातील कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली.
निवडणूक आयोगाने केंद्रनिहाय मतदार जागृती पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात ५९ आणि शहरी भागात १९५ पथक स्थापन करण्यात आले आहे. सन २०१९ मध्ये ज्या केंद्रांवर मतदान कमी झाले आहे. तसेच महिलांची टक्केवारी कमी झालेल्या केंद्रांवर लक्ष केंद्रीत करून तेथे कामावरून घरी आलेल्या मतदारांना भेटून त्यांच्यात जनजागृती करावी. त्याचबरोबर एकूणच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासह निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, बीएलओ, बीएलओ सुपरवायझर, क्षेत्रीय अधिकारी, शिक्षक, आदी ८०० हून अधिक कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!