हातकणंगले / ता. २२.
हातकणंगले येथील आठ नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये पोलिस ठाण्यांतील तीन कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले असुन एका पोलीस पत्नीचाही समावेश असल्याने धाबे दणाणले आहेत . मात्र उर्वरीत ३५ पोलीसांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
हातकणंगलेतील रुग्णांची संख्या एकूण २७ झाली असून त्यामध्ये एका मृताचा समावेश आहे. गुरुवारी मृत पावलेल्या ७० वर्षीय वद्धाच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी दिले होते. त्यापैकी एकाच घरातील पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे शिवाजी चौक परिसर सील केला असून आज औषध फवारणी करण्यांत आली. पोलिस ठाण्यांतील एक महिला कॉन्स्टेबल कोरोना बाधित झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलीस दलांत खळबळ उडाली होती.एक डिवायएसपी, दोन सहा. पो.नि सह चाळीस पोलिसांचे स्वॅब तपासणीसाठी दिले होते. त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे तर सुरुवातीला बाधित झालेल्या माहिला कॉन्स्टेबल यांचा एका पोलीसांच्या पत्नीशी संपर्क आला होता. त्यांचाही अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.