हातकणंगले /ता.७-प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाचे हॉटेलना केवळ पार्सल जेवण देणेचा आदेश बंधनकारक असताना ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवुन जेवण दिलेचे कारणावरून हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार हॉटेलवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. त्यामध्ये अतिग्रे ,हेरले व हातकणंगले येथील हॉटेलचा समावेश आहे. ही कारवाई हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भवड यांचे मार्गदर्शनाखाली दिग्विजय देसाई, राकेश इंदुलकर, सचिन हाके, अतुल निकम, सागर पोवार, लखनराज सावंत, व भूषण शेटे यांनी कारवाई केली.