हातकणंगले लोकसभेचा उमेदवार ‘ मशाल ‘ चिन्हाचाच

मातोश्रीवरून दोन दिवसानंतर घोषणा : ‘ उपरा ‘ उमेदवार चालणार नाही

हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचा उमेदवार हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा निष्ठावंतच असणार आहे. उचल्या अथवा आयात उमेदवारास उमेदवारी दिली जाणार नसुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खास . राजु शेट्टी यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा पाठींबा पाहीजे असेल तर त्यांनाही ‘ मशाल ‘ चिन्हावरच लढावे लागेल . असे मुंबई येथील शिवालय कार्यालयातुन जाहीर करण्यात आले आहे . राजु शेट्टींनी पाठींबा न घेतल्यास माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजीत पाटील व उल्हास पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता असुन दोनच दिवसात मातोश्रीवरून उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे .
हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीकडुन उद्धव ठाकरे शिवसेनेला जागा सोडली आहे . सुरवातीला राजु शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर पाठींब्यासाठी भेट घेतली . प्रत्यक्ष पाठिंबा मिळणार हे ठरले पण राजु शेट्टी यांनी आज अखेर एकला चलो रे ची भुमिका घेत केवळ बाहेरून पाठींबा देण्याची मागणी केली . त्याला महाविकास आघाडीच्या पक्षातील नेत्यांनी आघाडीकडुन निवडणुक लढविण्याची विनंती केली . मात्र शेट्टी यांनी धुडकावुन लावल्याने महाविकास आघाडीकडुन उमेदवार देण्याचे निश्चित झाले असुन उमेदवार निवडीचे अंतिम निर्णय घेण्याचा आधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे .
आज मुंबई येथील शिवालय कार्यालयात कोल्हापुरचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली . उमेदवार निवडीचे अंतिम आधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असुन हातकणंगले लोकसभेचा उमेदवार हा शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक असला पाहीजे . कोणत्याही परिस्थितीत आयात केलेला अथवा उचल्या उमेदवार चालणार नाही . त्यातुनही स्वाभिमानीच्या राजु शेट्टी यांनी उमेदवारी घेतल्यास त्यांना सुद्धा मशाल चिन्हावरच लढावे लागेल . निवडणुकीत मशाल चिन्ह हे अधिकृतपणे मतदान मशिनवर दिसले पाहीजे . ही आग्रही भुमिका असल्याचे सांगण्यात आले आहे . तसेच निष्ठावंत शिवसैनिकांमधील उमेदवारांचा विचार केल्यास माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजीत पाटील व उल्हास पाटील या तिघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता असुन दोनच दिवसात मातोश्री वरून उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे.
बैठकीस माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल मगदुम, प्रविण यादव , महेश चव्हाण यांच्यासह हातकणंगले व शाहुवाडी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते .

चौकट-
लोकसभा निवडणुक लढविणारच : राहुल आवाडे
मी लोकसभा निवडणुक तर लढविणारच आहे . महाविकास आघाडीकडुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा निष्ठावंत व अंतर्गत निर्णय काय होतो ते बघावे लागेल . टप्याटप्याने आपल्याला पुढे जायचे आहे . त्याविषयी लगेच बोलणे योग्य ठरणार नाही .

error: Content is protected !!