हातकणंगले लोकसभा संयोजकपदी तानाजी पोबार

इचलकरंजी : येथील माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांची हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे संयोजक म्हणून निवड झाली आहे. तानाजी पोवार हे मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी गत नगरपालिका निवडणुक जिंकत तीन वर्षे उपनगराध्यक्ष म्हणून म्हणून काम पाहिले. दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्यांची कामे करणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. निवड झाल्यानंतर बोलताना तानाजी पोवार म्हणाले, गतवेळची लोकसभा निवडणुक माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्याने धैर्यशील माने हे विजयी झाले होते.
यावेळीही महायुती जो उमेदवार देईल त्याचा प्रचार माजी आमदार हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करून निवडून आणणे हे प्रथम कर्तव्य राहिल. त्यांच्या या निवडीबद्दल पदाधिकारी व नागरिकातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!