हातकणंगले /प्रतिनिधी
कोरोणाच्या वाढत्या पार्श्वभुमिवर शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात हातकणंगलेच्या पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी व वाहतुक नियंत्रक ( ट्रॅफिक ) पोलीसांनी विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर एप्रिल महिन्यात १२५४ केसेस दाखल करून ३ लाख २९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार तसेच परि. पोलीस उपअधीक्षक साहील झरकर यांच्या मार्गदर्शनानुसार या कारवाया करण्यात आल्या असुन या कारवायांमुळे विनाकारण फिरणाऱ्या लोकांना चांगलाच चाप बसला आहे. हातकणंगले वाहतूक पोलीस हवालदार घुगरे व कॉन्स्टेबल अतुल निकम यांनी या कारवाया केल्या असुन जयसिंगपूर विभागामध्ये या कारवायांचे सर्वोत्तम रेकॉर्ड झाले असुन जिल्हा पोलीस प्रमुखानी घेतलेल्या कॉन्फरन्स मध्ये हातकणंगले पोलीसांचे विशेष कौतुक केले आहे.