हातकणंगले / ताः १ प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या हातकणंगले तालुक्याची विविध विभागांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . जिल्हा परिषद सदस्य अरूणराव इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . यामध्ये युवा मोर्चा , किसान मोर्चा , अल्पसंख्याक सेल, अनु. जाती जमाती विभाग, ओबीसी आघाडी , तसेच शहर विभागातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या .

निवडी पुढीलप्रमाणे –
तालुका उपाध्यक्ष – पुंडलीक बिरंजे, ,सुदाम इंगवले ( कोषाध्यक्ष ), सुनिल हावळे (किसान मोर्चा उपाध्यक्ष ) तानाजी पाटील , सागर पाटील, शिवाजी सादळे ( चिटणीस ) , वैभव पाटील – (युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ), विनोद तांबे , प्रदिप कदम , अमोल भोसले, गुंडा खोत( युवा मोर्चा उपाध्यक्ष ), राहुल महाजन ( चिटणीस), मुनेर मुजावर (अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष ) , अनु. जाती जमाती विभाग – दिनकर कोठावळे ( उपाध्यक्ष ) ,रोशन कांबळे , श्रावण कांबळे, बाबासो पोळ ( चिटणीस), अतुल कांबळे ( सदस्य ) , भूपाल नाईक, बापूसो पाटील , भूपाल तोरस्कर , विवेक कुलकर्णी , संदीप भंडारी ( तालुका कार्य . सदस्य ) ,ओबीसी आघाडी- राजू खरोशे ( अध्यक्ष ) ,नंदकूमार माळी ( उपाध्यक्ष ), तातोबा हांडे ( चिटणीस ),प्रसाद कोळी ( सरचिटणीस ) , आण्णासो चौगुले ( निमंत्रीत सदस्य ) हातकणंगले शहर पंकज बुढ्ढे ( शहर अध्यक्ष ) , राजू सुर्यवंशी ( कोषाध्यक्ष ) , दिनानाथ मोरे ( उपाध्यक्ष ) , अरूंधती सूर्यवंशी ( महिला आघाडी उपाध्यक्षा ), मयूर कोळी ( ओबीसी आघाडी चिटणीस ) यांच्या निवडी करण्यात आल्या .
सदरच्या निवडी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील , प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर , जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे , यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य अरूणराव इंगवले , जिल्हा उपाध्यक्ष ( ग्रामीन ) अजिंक्य इंगवले , तालुका अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळून निवडीचे पत्र देण्यात आले .
