हातकणंगले तालुका मराठा समाज समन्वय समितीकडून कर्नाटक सरकारचा निषेध , पूर्ववत प्रतिष्ठापना न केल्यास आंदोलनाचा इशारा ; तहसीलदारांना निवेदन

हातकणंगले /दि:१० भाऊसाहेब फास्के

          हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मणगुत्ती (ता.हुक्केरी) येथील पुतळा दडपशाही मार्गाने हटविणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतानाच सदरच्या पुतळ्याची सन्मानाने पूर्ववत प्रतिष्ठापना करावी . अशी मागणी हातकणंगले तालुका मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने आज (सोमवारी) तहसीलदार डॉ.प्रदीप उबाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
         याप्रश्नी कर्नाटक सरकारकडून दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी वंदनीय आणि आदर्शवत राजे आहेत. इतकेच नव्हे . तर सर्वधर्मियांचे दैवत असणाऱ्या राजांचा पुतळा चौथऱ्यावरून रातोरात हटविण्याचा प्रकार निंदनीय आणि निषेधार्ह आहे. कानडी सरकारच्या भूमिकेमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याची दखल घेवून हुक्केरी तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाने येत्या आठवडाभरात त्याच ठिकाणी पुतळा बसवण्याचे मान्य केले आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे . मात्र त्याची अंमलबजावणी वेळेत करावी . अशी आमची मागणी आहे. पण याकडे दुर्लक्ष केल्यास आम्हाला तीव्र आंदोलन हाती घ्यावे लागेल.

  हातकणंगले तालुका मराठा समाज समन्वय समितीकडून तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देताना शिवप्रेमी कार्यकर्ते ……

        समन्वय समितीचे उपाध्यक्ष दीपक कुन्नूरे, सचिव भाऊसाहेब फास्के यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना भेटलेल्या शिष्टमंडळात खजिनदार अमित गर्जे, नगरसेवक दीनानाथ मोरे, पंडित निंबाळकर, राहुल मोरे, सुरेश भगत, बाबुराव जाधव, दिलीप खोत, प्रवीण केर्ले, सोमेश भोसले, मनोज सूर्यवंशी, सुरेश कोळी, बजरंग मोरे, अक्षय लोंढे, लक्ष्मण भावके, मुकेश नागणे, अरुण परीट आदींचा समावेश होता.

error: Content is protected !!