हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत ६९७ लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर

हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक अध्यक्ष झाकीरहुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत एकूण १००७ प्रस्ताव दाखल झाले होते . त्यापैकी ६९७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ३१० प्रस्तावात त्रुटी आढळल्या असून सदरचे प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तलाठ्यांमार्फत तात्काळ पुढील मीटिंग मध्ये सादर करण्याचे ठरले. यावेळी तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे-भंडारे , समिती सदस्य महेंद्र शिंदे, बाळासाहेब गायकवाड, अमोल गावडे, दौलत पाटील, सुदाम इंगवले, संदेश भोसले, तानाजी ढाले, संजय देसाई, सौ. कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

फोटो ओळ –
हातकणंगले – हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत उपस्थित मान्यवर .
error: Content is protected !!