पेठ वडगावात उद्या आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर

पेठ वडगाव : जागतिक आरोग्य दिनानिमित्त सूर वत्सल सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी बुधवार ३ एप्रिल रोजी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबीर व मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर येथील विठ्ठल मंदिर येथे घेण्यात येणार आहे. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुनिल चौगुले, व्हाईट आर्मी संघटना संस्थापक अशोक रोकडे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचे आयोजन सन्मान सेवा वृद्धाश्रम व केअर सेंटरच्या संचालिका डॉ. अंजना जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!