हेरलेत महिला कोरोना पॉझिटिव्ह ; उद्या नातेवाईकांची स्वॅब तपासणी

हेरले / ता :23

        हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरची महिला मौजे वडगाव गावातील परिसरामध्ये राहण्यास असल्याने गावातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोराना पॉझिटिव्ह आलेली महिला हेरले गावची रहिवाशी असून त्यांचे कुटुंब राहण्यास मौजे वडगावच्या एका माध्यमिक शाळेजवळ राहण्यास आहेत. ती कोल्हापूर येथील खाजगी दवाखाण्यात नोकरीस आहे. 

        गुरुवारी २३ रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हेरले गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहेत. ही घटना समजताच हेरलेच्या पोलिस पाटील नयन पाटील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदीप चौगुले माजी उपसरपंच विजय भोसले व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करून येथे बॅरिकेट लावून हे क्षेत्र सील केले आहे.

        कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे पती, सासू, व दोन मुले यांचा स्वॅब घेण्यासाठी अतिग्रे येथील संस्थात्मक विलगिकरणामध्ये शुकवारी रोजी त्यांना पाठविणार असल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना माहिती दिली आहे. त्यांच्या पतींच्या फर्स्ट व सेकंड संपर्कातील लोकांची लिस्ट काढण्याचे काम सुरू आहे. त्यांची यादी काढून त्यांना होम क्वारंटाईन करणार असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हेरले ग्रामपंचायतीकडून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!