हिंदुत्ववादी नेते दिलीप भिवटे यांना महाराष्ट्र हिंदू महासभेचा स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू संघटक पुरस्कार जाहीर

कोल्हापूर /ता. १-प्रतिनिधी
       कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ हिंदुत्ववादी नेते दिलीप भिवटे यांना महाराष्ट्र हिंदू महासभेच्या वतीने सन 2019-20 चा स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू संघटक पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार प्राप्त भिवटे यांचा अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे संपर्क नेते गोविंद गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला.

         यावेळी प्रदेश प्रवक्ते आनंद कुलकर्णी , कोषाध्यक्ष राजेंद्र शिंदे , महिला सभेच्या नूतन अध्यक्षा रेखा दुधाणे , जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, समन्वयक कार्यवाह संजय कुलकर्णी , प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार घोरपडे , प्रमुख कार्यवाह विलास खानविलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते . कोल्हापूर दौऱ्यावर आलेले गोविंद गांधी यांनी पक्षाच्या अनुशासन समितीची बैठक घेवुन हिंदु महासभेच्या महिला संघटन वाढीबाबत मार्गदर्शन केले .

error: Content is protected !!