विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त सोमवारी मा.राज्यपाल कोल्हापूरात येणार

जिल्हा प्रशासनाकडून नियोजनाबाबत बैठक संपन्न

कोल्हापूर : महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस सोमवार, दि.18 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे विकसित भारत संकल्प यात्रे निमित्त आयोजित कार्यक्रमाला येणार आहेत. तसेच शहरातील इतर कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने नियोजनाबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी याबाबत सर्व विभागांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी बैठकिला महसूल, पोलीस, वाहतूक, जिल्हा परिषद, आरोग्य, महानगरपालिका, कृषी यासह शिवाजी विद्यापीठ, रेड क्रॉसचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

राज्यपाल महोदय दि.18 डिसेंबर रोजी सकाळी येत असून ते श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार आहेत. नंतर रेड क्रॉस रोटरी क्लब कार्यालयात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर स्वयंम रेड क्रॉस शाळेत भेट देणार आहेत. नंतर शिवाजी विद्यापीठ येथे आयोजित दीक्षांत समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर कंदलगाव येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्याठिकाणी संकल्प यात्रेच्या निमित्ताने आयोजित स्टॉल्सला भेटी देवून लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी विविध शासकीय योजनांतील लाभ लाभार्थ्यांना त्यांचेहस्ते वितरीत केला जाणार आहे

error: Content is protected !!