आदर्श गाव करण्यासाठी 23 वर्षांची अंकिता झाली सरपंच

अमरावती / प्रतिनिधी

   राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या (Amravati Shirala Village). आता गावागावात सरपंच निवडीला सुरुवात झाली आहे. गावचा सरपंच म्हणजे चांगला अनुभवी व्यक्ती, राजकारणात मुरलेला असावा. त्याचं वय त्याची प्रतिष्ठा हे सर्व बघितल्या जात असते. तरी अमरावती जिल्ह्यातील शिराळा या 18 हजार लोकवस्तीच्या गावाचा गाढा 23 वर्षाची उच्च शिक्षित असलेली अंकिता मिलींद तायडे ही तरुणी हाकणार आहे. नुकतीच तिची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे (Amravati Shirala Village 23 Year Old Ankita Tayade Became The Young Sarpanch).

  अंकिता तायडे ही उच्चशिक्षित असून तिचे शिक्षण एमएससी झाले आहे. त्यामुळे माझे शिक्षण माझ्या गावाच्या विकासासाठी नक्कीच कामी येईल. माझं शिक्षण पाहून गावातील लोकांनी मला निवडून दिले आहे. माझ्याकडूनही त्यांना खूप अपेक्षा आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करुन माझं शिराळा गाव कसं आदर्श होईल, महाराष्ट्रात माझ्या गावाला एक वेगळी ओळख कशी मिळेल, यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याच नवनिर्वाचित सरपंच अंकिता तायडे यांनी सांगितले.

  अंकिता सरपंच झाल्याने महिलांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे. आपल्या गावचा कायापालट होणार अशी भाबडी आशा गावकऱ्यांना लागली आहे. निश्चित येणाऱ्या काळात अंकिता कसा गावचा विकास करणार हे येणारा काळ ठरविणार आहे.   

error: Content is protected !!