दोन घास माणुसकीचे, आपल्या माणसांसाठी आपल्या हुपरीकरांचे…

         प्रचंड वेगाने प्रगती करणाऱ्या आणि डिजिटल होण्याचे स्वप्न साकारणाऱ्या आपल्या देशामध्ये आजही कित्येक गरीब निराधार लोक अर्धपोटी दिवस ढकलतात. मोफत अन्नछत्र संकल्पना एक – दोन मर्यादित दिवसापुरती खूप ठिकाणी पहायला मिळतात . अनेक देवस्थान व समाजसेवी संस्थांच्या ठिकाणीसुद्धा वर्षानुवर्षे दररोज अन्नछत्र चालवली जातात. पण सध्याच्या लॉकडाऊनमध्ये सर्वच अन्नछत्र काही समाजसेवी संस्था वगळता बंद आहेत . जगात आजही अन्नदान सर्वश्रेष्ठ मानले जाते. याच गोष्टीचा विचार करून चांदीनगरी हुपरीतील समाजाचे आपणंही काही तरी देणं लागतो या प्रेरणेने प्रमोद गाठ आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून गरजू , अनाथ व वयस्क लोकांना मोफत जेवण देण्याचा विचार ठरला . आणि सर्वांच्या संकल्पनेतून अन्नदान सेवा केंद्राचा उदय झाला .

          अन्नदान सेवा 26 जानेवारी 2020 पासून सुरु झाली . ती आज अखेर सुरू आहे . दररोज सकाळी व संध्याकाळी दोन वेळेस 15 वयस्क निराधार ज्येष्ठ नागरिकांना गेली सहा महीने मोफत जेवण देण्याची सेवा सुरू आहे . ऊन वारा पाऊस असो किंवा कोरोना सारखा साथीचा फैलाव असो या वयस्क गरजुनां रोज जेवण घरपोच सेवा दिली जाते. त्यामध्ये एकही वेळ अथवा दिवस खंड पडलेला नाही . रोजचा खर्च हा एक हजार पन्नास रुपये इतका आहे. कुणाचा वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस ,अशी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने अनेक देणगीदार कार्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदत करत आहेत.

                दिवसातून दोन वेळा घरपोच सेवा देण्यासाठी दररोज 13 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो . या सेवेने प्रेरित होऊन अनेक युवक पुढाकार घेवुन अविरतपणे करत आहेत . आता वेळ आहे , या सेवेत आपणही सहभाग होण्याची . आपल्यासारख्या असंख्य देणगीदारांनी या सेवेत झोकुन घेवुन मदत करण्याची गरज आहे . यातुनच आपल्या माध्यमातुन अनेक लोकांना अन्नदान होवु शकते तेही आपल्या माणसांकडून आपल्याच माणसांना ..

यात कोणास दान करावयाचे असेल तर संपर्क करावा…
प्रमोद गाट-७३५०९९७२५४
उमेश दैने – ८४४६२२७३३३
प्रविण माळी -९७३०१८११९०

error: Content is protected !!