इचलकरंजी : प्रतिनिधी
रोलबॉल खेळास केंद्राप्रमाणे राज्यात आरक्षण मिळावे . यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही बालाजी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मदन कारंडे यानी दिली.
रोलबॉल या खेळास केंद्र शासनाने 1 सप्टेंबर रोजी पाच टक्के आरक्षण जाहीर केले. या विषयावरून कोल्हापूर जिल्हा रोलबॉल संघटनेचे पदाधिकारी यांनी बालाजी शिक्षण ,उद्योग व सहकार समूहाचे अध्यक्ष श्री. कारंडे यांची भेट घेऊन आढावा बैठक घेतली. रोल बॉल खेळाचे जनक महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशनचे सचिव राजू दाभाडे यांच्या अथक प्रयत्नातून केंद्र शासनाने रोल बॉल खेळास इतर खेळाप्रमाणे केंद्रीय सेवेत ‘क’ श्रेणीसाठी राखीव आरक्षण जाहीर केले. जिल्हा संघटना सचिव श्री अमित पाटील यांनी खेळाची पार्श्वभूमी सांगितली . महाराष्ट्र शासनाने सुद्धा सदर आरक्षण जाहीर करून खेळाडूंना मानाचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव करावा. अशा प्रकारची चर्चा केली.

श्री. मदन कारंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बैठक करून हा विषय सविस्तर त्यांना आपण सर्वजण बैठक घेऊन सांगू अशा प्रकारची ग्वाही दिली. रोल बॉल खेळाची व्याप्ती वाढेल. यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
याप्रसंगी रोलबॉल जिल्हा संघटना पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सदस्य हारगे , संजय खूळ, मुख्याध्यापिका एम एस रावळ , उत्तम पाटील ,राजेश चौगुले, रवी चौगुले ,उत्तम मेंगणे, राहुल जोशी उपस्थित होते.