इचलकरंजीत सख्या बहिनीनेच घातला लाखोंचा गंडा

   रक्षाबंधनच्या कालावधीवतच नात्याला काळीमा फासणारी घटना इचलकरंजी शहरात घडली आहे. सख्ख्या बहिणीलाच बहिणीने आपल्या मुलासह 29 लाख 19 हजार रूपयांना गंडा घातला आहे. यामध्ये बँक खात्यातील 24 लाख 99 हजार आणि 4 लाख 20 हजार ऊपये किंमतीचे 85.25 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.   याप्रकरणी हेमा प्रताप डांगरे, तिचा मुलगा अक्षय प्रताप डांगरे (दोघे रा. सुंदरबागेनजीक, इचलकरंजी), योगेश दायमा यांच्यावर गावभाग पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्योती प्रकाश पांढरपोटे (मूळ रा. सातारा, सध्या कोरोची, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे.
CRIME

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी ज्योती पांढरपोटे आणि संशयीत हेमा डांगरे या सख्ख्या बहिणी आहेत. ज्योती यांचे पती सरकारी नोकरीत होते. कोरोनाकाळात त्यांचे निधन झाले. यानंतर ज्योती यांना पतीचा पगार, पेन्शन आणि इतर लाभाचे लाखो रुपये मिळाले. दरम्यान, त्यांची बहिण हेमा आणि तिचा मुलगा अक्षय यांनी ज्योती यांचा विश्वास संपादन केला. त्यांना साताऱ्याहून राहण्यास आणले. दरम्यान, आई आणि मुलाने संगनमत करून अक्षयचा मित्र योगेशला मदतीला घेतले. त्यानंतर ज्योती यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह बँकेतील रोकडीवर डल्ला मारण्याचा प्लॅन केला. त्यानुसार तिघा संशयितांनी त्यांच्या बँक खात्यावरील 24 लाख 99 हजार रूपयांची रोकड एटीएम कार्डचा वापर करून परस्पर काढले. तसेच त्यांचे 4 लाख 20 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिनेही लंपास केले.
हा प्रकार ज्योती यांच्या लक्षात येताच त्यांनी बँकेतून काढलेली रोकड व दागिणे परत करण्यात सांगितले. त्यावेळी संशयितांनी तिला शिवीगाळ करून मारहाण केली. पैशाबाबत पोलिसांना किंवा अन्य लोकांना सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर ज्योती यांनी गावभाग पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. आपल्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची चाहुल लागताच संशयित शहरातून पसार झाले आहेत. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

error: Content is protected !!