इचलकरंजीत लवकरच मोफत व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र

       मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी मार्फत टी. बी. क्लिनिक येथे लवकरच मोफत व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ते आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दुपारी चार ते पाच या वेळेत सुरू असेल, अशी माहिती मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष डॉ. शरद मिठारी यांनी दिली.

      बुधवारी (ता. १३) दुपारी चार ते सहा या वेळेत डॉ. चंद्रशेखर हलिंगळे यांचे ‘व्यसनमुक्ती- सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. केंद्रात डॉ. संदेश पाटील, डॉ. सिमॉन आवळे व डॉ. सचिन केतकर यांचे सल्ला व मार्गदर्शन मिळणार आहे.

error: Content is protected !!