उद्या सुळकूड पाणी योजनेसाठी इचलकरंजीत मानवी साखळी

गेले अनेक दिवस प्रलंबित असलेल्या इचलकरंजी-सुळकूड पाणी योजनेसाठी शनिवारी (दि. ९) सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर मानवी साखळी करण्यात येणार आहे.त्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीने पत्रकार परिषदेत केले.

संग्रहित छायाचित्र

शनिवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत एक तास लोकमान्य टिळक पुतळा, गांधी पुतळा, शिवतीर्थ ते छत्रपती शाहू महाराज पुतळा अशी मुख्य रस्त्यावर मानवी साखळी करण्यात येणार आहे. रस्त्याच्या बाजूला उभे राहून मानवी साखळीमध्ये उभे राहून नागरिकांनी सहभागी व्हावे. शहरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी हातात फलक घेऊन या साखळीत सहभागी होणार आहेत. दरम्यान या योजनेसाठी मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत २५ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहेत. ५० हजार लोकांच्या सह्या एकत्रित जमा केल्या आहेत.

error: Content is protected !!