आमदार यड्रावकरांनी पाणी आणून द्यावे त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढू – आमदार प्रकाश आवाडे

धरण दुरुस्तीमुळे सध्या पाण्याची कमतरता दिसत आहे. पण धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरही जर पाणी कमी पडत असेल अन्य पर्याय शोधू. अन्यथा इचलकरंजीला सुळकूडमधूनच पाणी घेऊ. धरण दुरुस्तीसाठी काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत आम्ही थांबू, पण पाणी सुळकूडचेच आणू, असे सूतोवाच आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. तर ज्यांना इचलकरंजीच्या (Ichalkaranji) पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटू नये असे वाटते त्या मंडळींकडून महापालिका आयुक्तांवर दबाव टाकून 100 शुध्द पेयजल प्रकल्प सुरु करु दिले जात नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.


आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 6 कोटी 25 लाख रुपये निधीतून सांगली नाका ते यड्राव फाटा रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते.
इचलकरंजी शहरासाठीच्या सुळकूड योजना संदर्भात बोलताना आमदार आवाडे यांनी, कमी पाण्याचे कारण सांगत जागा बदला असे सांगितले जात आहे. पण जागा का बदलायची असा सवाल तर मनात येईल तेव्हा जागा बदलत राहिलो तर योजनाच होणार नाही. धरण दुरुस्तीमुळे यंदा ते अर्धेच भरले. दुरुस्तीनंतर तेथील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन जर पाणी पडत असेल तर निश्‍चितपणे पर्याय शोधू. नाहीतर इचलकरंजीला सुळकूडचेच पाणी घेऊन असे त्यांनी ठामपणे सांगितले. पाणी सुळकूडचेच आणायचे हे ठरविले आहेत. त्यामध्ये आमदार यड्रावकर आमच्या सोबत आहेतच, त्यामध्ये पालकमंत्र्यांना सहभागी करुन घेतले तर काहीच अडचण येणार नाही. आमदारांनी पाणी आणून द्यावे त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढू असेही आमदार आवाडे म्हणाले.
इचलकरंजीसाठी 6 जलकुंभ मंजूर झाले असून त्याचे टेंडर लवकरच निघणार आहे असे सांगत आमदार आवाडे यांनी, इचलकरंजीत फार राजकारण सुरु असून कोणता अधिकारी कोणाचा हे शिक्केच बसले आहेत. तर नवीनच आलेल्या आयुक्तांना कोणी, का व कशासाठी आणले हे माहिती नाही. पण शासनाने मंजूर केलेले व निधीही दिलेले 100 शुध्द पेयजल प्रकल्प ते सुरु करत नाहीत. म्हणूनच ज्या ज्या मंडळींना इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटू नये असे वाटते त्यांच्याकडून आयुक्तांवर दबाव टाकत प्रकल्प सुरु होऊ दिले जात नसल्याचा टोला लगावला.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मुख्यमंत्र्याच्या अगदी जवळचे असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निर्णय त्यांना विचारल्याशिवाय होणारच नाही. म्हणूनच ते जो निर्णय करतील त्यात आम्ही सहभागी आहोत. इचलकरंजी व शिरोळ आता एक व्हायला लागत आणि आम्ही दोघं एक झालो की हातकणंगले घेतो, मग सगळं पार पडतंय असे सूतोवाचही त्यांनी केले. तर कागलमधूनही या योजनेला कसलाही विरोध नाही. पण आता लोकसभा निवडणूक जवळ आली असल्याने सर्वजण एकमेकांच्या सूरात सूर मिसळत आहेत. म्हणूनच दोन वर्षे थांबण्याची आमची सहनशिलता असून पाणी सुळकूूडमधूनच आणणार असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, ताराराणी पक्ष इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, ताराराणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब चौगुले, संचालक दादासो सांगावे, सुकुमार किणिंगे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, भाजप जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, विजय भोजे, अनिल स्वामी, चंद्रकांत पाटील, संजय केंगार, श्रेणिक मगदूम, नरसिंह पारीख, सुलोचना हेरवाडे, सतिश मुळीक, गोगा बाणदार, अशोक पुजारी, अनिल बम्मन्नावर, राजू कोरे, प्रदीप गोलगंडे, चिंतामणी रानभरे, सचिन हेरवाडे, बाबासो राजमाने, प्रदीप दरीबे, समीर मुल्ला, प्रताप लाखे, बिलाल पटवेगार, मारुती नाईक, गिरीजा हेरवाडे, सावित्री कुंभार, नंदाताई साळुंखे, मंगला सुर्वे, शबाना शिकलगार व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!