इचलकरंजीत आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

     श्री दगडूलाल मर्दा स्मृती आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चैतन्य कांबळे (कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी) याने प्रथम क्रमांक मिळवला. तेजस्विनी पांचाळ (आयुर्वेदिक कॉलेज, बोरपाडळे) हिने द्वितीय, तर अनुजा पाटील (श्रद्धा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, इचलकरंजी) हिने तृतीय क्रमांक पटकावला.

इचलकरंजी येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजीतर्फे पंधराव्या वर्षी स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतील उत्तेजनार्थ क्रमांक तेजश्री शिंदे (आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी) आणि सलोनी मडिवाळ (गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी) यांनी प्राप्तआवश्यक असल्याचे मत श्री. मर्दा यांनी व्यक्त केले. स्पर्धेचे उ‌द्घाटन प्रा. डॉ. अमर कांबळे, श्रद्धा झंवर, घनश्याम सावलानी, सुरेश रोजे यांच्या उपस्थितीत झाले.

परीक्षक म्हणून प्रा. रवींद्र पाटील (कबनूर), डॉ. अशोक पाटील (रुकडी) आणि गीता साने (सांगली) यांनी जबाबदारी पार पाडली. प्रास्ताविक समीर गोवंडे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष आबाळे आणि कपिल पिसे यांनी केले.

error: Content is protected !!