श्री परशुराम बहुउद्देशीय सेवा संस्था, इचलकरंजी यांचे मार्फत आपल्या रूढी परंपरा चालू रहाव्यात आणि पुढील पिढीला त्या बद्दल माहिती व्हावी आह्या करिता विविध उपक्रम केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून काल (रविवार ) अधिक मास निमित्त दांपत्य भोजन कार्यक्रमाचे आयोजन रामजानकी हॉल येथे करण्यात आले होते.ह्या उपक्रमांस अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचा सुरवातीला परशुराम सेवा संस्थेचा महिलांनी विष्णूसहस्त्र नाम पठण केले. शास्त्रप्रमाणे संस्थेतर्फे दामपत्यास दीप आणि वस्त्र दान देण्यात आले भविष्यात परशुराम सेवा संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाना ज्ञाती बांधवांकडून असाच प्रतिसाद मिळावा आणि काही नवीन संकल्पना असतील तर संस्थेस जरूर कळवावीत असे आव्हाहन संस्थेचे अध्यक्ष त्रिगुण पटवर्धन यांनी केले.