इचलकरंजीत रविवारी ज्येष्ठ नागरिक संमेलनाचे आयोजन

इचलकरंजी

येथील रोटरी क्लब आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक संमेलनाचे रविवार ३१ रोजी श्रीमंत ना.बा. घोरपडे नाट्यगृह येथे आयोजित केले आहे.
उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव विकास खारगे यांचे हस्ते होणार असून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे प्रांतपाल नासिर बोरसदवाला हे अध्यक्षस्थानी असतील तसेच उपप्रांतपाल राजेश कोडुलकर व डी.जी.एन. अरुण भंडारे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. एम. ए. बोरगावे व नृत्यकला प्रशिक्षण योगदानाबद्दल सायली होगाडे यांच्या सत्कार प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती, युवक सर्वांनी या स्नेहसंमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!