इचलकरंजीत रविवारी धुंधुरमास सोहळ्याचे आयोजन

 सूर्य धनु राशीत भ्रमण करतो. त्याल धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’ म्हणतात. याच रुढी परंपरा जपण्यासाठी व नवीन पिढीला कळण्यासाठी श्री.परशुराम बहुउद्देशीय सेवा संस्था व चित्पावन संघ यांच्या वतीने धनुर्मास कार्यकर्माचे आयोजन केले असते. 
 या धनुर्मासात आपला जठराग्नी भल्या पहाटे जागृत होतो. त्यामुळे या महिन्यात पहाटे उठून, या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खायचे महत्त्व फार आहे. हे खाणं इतर ऋतूंमध्ये पचायला जड असलं, तरी या ऋतूमध्ये मात्र ‘राजस’ मानलं गेलं. एवढं याचं प्रचंड महत्त्व पूर्वजांकडून सांगितलं गेलं आहे.
सदर कार्यक्रम दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजता श्री.चिंतामणी गार्डन येथे आयोजीत केला आहे. कार्यक्रमास सर्व ज्ञाती बांधवांनी जरुर उपस्थित रहावे  असे आवाहन चित्पावन ब्राह्मण संघ व श्री.परशुराम बहुउद्देशीय सेवा संस्था,इचलकरंजी. यांच्या वतीने करण्यात आले आहे 
error: Content is protected !!