आज इचलकरंजीत प्रकाश आंबेडकर यांची सभा

वंचितच्या उमेदवाराची घोषणा शक्यता

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सभा, मेळावे, बैठकांचा जोर धरला असून वंचित आघाडीनेही स्वतंत्र यंत्रणा कामास लावली आहे. या पार्श्वभुमीवर आज सायंकाळी ४ वाजता अॅड. प्रकाश आंबेडकर यांची हातकणंगले लोकसभा मतदार संघातील, इचलकरंजीत शहरात भव्य सभा आयोजित केली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची घोषणा या सभेत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचितकडून कोण उमेदवार असेल, याची उत्सुकता लागून राहिली आहे. गत लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर झालेल्या विरोट सभेत

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अपरिचित अशा हाजी अस्लम सय्यद यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. या नवख्या उमेदवाराने विक्रमी मते घेतली होती.

error: Content is protected !!