इचलकरंजीत 16 फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय कोष्टी कला महोत्सव

 समाजातील उदयोन्मुख कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, त्यांना आपली कला सर्वांसमोर सादर करता यावी या उद्दात हेतुने  देवांग समाज (रजि.) आणि हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्ट यांच्यावतीने इचलकरंजीत 16 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय कोष्टी कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवांग समाजाचे अध्यक्ष विश्‍वनाथ मुसळे, कोष्टी परिवार कार्याध्यक्ष हेमंत कबाडे, हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल सरबी यांनी दिली. या महोत्सवामध्ये राज्यभरातील विविध भागातून अनेक कलाकार, विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत.

विविध क्षेत्रातील कलाकारांना कलेच्या माध्यमातून वेगळे महत्व प्राप्त होवून त्यांनी बनविलेल्या कलाकृती कलाप्रेमींना विकत घेता याव्यात अणि कलाकारांच्या कलेची दाद मिळावी त्यांना या उदात्त हेतुने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध राज्यस्तरीय स्पर्धामध्ये सहभागी कलाकारांना सोबतच आपला व्यवसाय व्याप सांभाळून विविध कलेत पारंगत कलाकार, महिला, विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या अंगभूत कलेला संधी मिळण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून दिले जाते.

असा हा अनोखा उपक्रम कोष्टी समाजाच्या माध्यमातून राबविला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थी, जी. डी. आर्ट, कमर्शिअल आर्टीस्ट, हौशी कलाकार यांची उत्कृष्ठ निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, आर्कचित्रे, मातीकाम, स्थापत्य कलेतील शिल्पे, कल्पक शिल्पकृती, काष्टशिल्प, कल्पक पोस्टर्स, छायाचित्रकारांची छायाचित्रे, शिल्पकृती, हौशी कलाकार तसेच इचलकरंजीतील ललितकला महाविद्यालयातील नामवंत कलाकारांच्या कलाकृती व इंप्रेशन फोटोग्राफी क्लब इचलकरंजी मधिल छायाचित्रकारांच्या विविध विषयावरील छायाचित्रांचा समावेश असणार आहे. तसेच नामवंत कलाकारांकडून प्रात्यक्षिकेही सादर केली जाणार आहेत.

हा कला महोत्सव इचलकरंजी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे 16 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत असून यामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या कलाकारांनी आपल्या कलाकृती 15 फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन समस्त कोष्टी समाजातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हेमंत कबाडे (9850111188) आणि सुनिल सरबी (9420132578) यांच्याशी संपर्क साधावा. याप्रसंगी सुलेखनकार विनायक चिखलगे, शिल्पकार निखिल करोशी व चित्रकार संजय वसंत आगलावे उपस्थित होते.

error: Content is protected !!