इचलकरंजीत मोबाईल हिसडा मारुन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

  इचलकरंजी येथे दुचाकीवरुन चोरट्यांनी कामगाराचा मोबाईल हिसडा मारुन लंपास केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघा सराईत चोरट्यांना अटक केली. राहुल विनोद पाथरवट (वय २१ रा. साईट नं. १०२) व अमोल उर्फ रविंद्र शिवाजी कामते (वय २४ रा. आसरानगर) अशी त्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून ६५ हजार रुपये किंमतीचे ५ मोबाईल आणि ५० हजाराची डीओ मोपेड असा १ लाख १५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी राजकुमार किशोरीलाल यादव (रा. संगमनगर) यांनी फिर्याद दिली होती.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तारदाळ संगमनगर 5-श्राविका, येथील राजकुमार यादव हे पार्वती औद्योगिक वसाहतीत कामास आहेत. १ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता ते काम आटोपून घरी निघाले होते. फोनवरुन बोलत ते चालत मुख्य प्रवेशद्वाराजवळून जात असताना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन त्यांचा मोबाईल घेऊन पलायन केले. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलिस सरपंच कॉन्स्टेबल असिफ कलायगार यांना ही चोरी रेकॉर्डवरील चोरट्यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यावरुन दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आणखीन चारठिकाणी असाच प्रकार केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून ५ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा १.१५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पाथरवट याच्यावर ७ तर कामते याच्यावर ४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. ही कारवाई पोलिस निरिक्षक विकास भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली असिफ कलायगार, शशिकांत ढोणे, अर्जुन फातले, अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, प्रमोद भांगरे, अमर वासुदेव आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!