भटक्या विमुक्त समाजातील विविध समस्या संदर्भात इचलकरंजी परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

इचलकरंजी/प्रतिनिधी
भटक्या विमुक्त समाजातील विविध समस्या संदर्भात चर्चा, विचारविनिमय करण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा समाजवादी प्रबोधिनी येथे पार पडला. या मेळाव्याचे आयोजन अखिल भारतीय भटक्या घुमंतु आदिवासी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूंदराव पोवार यांनी केले होते.


देशातील प्रत्येक प्रांतात भटक्या विमुक्त समाजातील लोक अजुनही हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांच्यासाठीचे आरक्षण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पध्दतीने दिले जाते. महाराष्ट्रातील या भटक्या विमुक्त लोकांसाठीचे आरक्षण व इतर फायदे हे अत्यंतु तुटपुंजे आहेत. या सामाजाचा विकास होण्यासाठी आदिवासीयांना जे कायदे लागू आहेत. ते कायदे भटक्या विमुक्त समाजाला लागू होण्यासाठी भटक्या विमुक्तांचा एस.टी. प्रवर्गात समावेश करण्यात यावा, अशी मागणी करत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर या संदर्भात लवकरच भटक्या विमुक्त समाज बांधवांचा व्यापक मेळावा घेऊन न्याय हक्कासाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रारंभी स्वागत बेलदार समाजाचे संजय मोहिते यांनी तर प्रास्ताविक कंजारभाट समाजाचे सुभाष घमंडे यांनी केले. यावेळी मुकूंदराव पोवार, बजरंग लोणारी, नौशाद जावळे, लक्ष्मण माने, नाथा चव्हाण सर, चंद्रकांत चव्हाण, मारुती कोरवी आदींनी मार्गदर्शन केले. तसेच विविध समाज घटकातील कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.  
मेळाव्यास कैकाडी, कंजारभाट, लोणारी, वडार, गोंधळी, गोसावी, कोल्हाटी, बहुरुपी, कोरवी, कडकलक्ष्मी, शिकलगार गारुडी आदी समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार संजय गोसावी यांनी मानले.

error: Content is protected !!