इचलकरंजी /ता. २१-प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने आज कोरोची ( ता.हातकणंगले ) येथे आयुष्य मंत्रालय प्रमाणित रोग प्रतिबंधक औषधी काढा वाटप करण्यात आले . यावेळी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष अभय यळरूटे ,सेक्रेटरी दीपक निंगुडगेकर ,असिस्टंट गवर्नर मनीष मुनोत , प्रकाश गौड ,वसंत पाटील , पंकज कोठारी , सागर पाटील ,ग्रामविकास अधिकारी श्री आर . बी . जाधव , ग्रामपंचायत सदस्य श्री शितल पाटील व श्री आण्णा सुतार मान्यवर उपस्थित होते .
यावेळी रोटरीचे अध्यक्ष अभय यळरूटे म्हणाले , रोटरी संस्था ही सामाजिक बांधिलकीतुन समाजसेवेचे काम जगभर करीत असते . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुष्य मंत्रालय प्रमाणित रोग प्रतिबंधक काढा प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे . तरी याचा वापर जास्तीजास्त लोकांनी घ्यावा .
सदरचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवुन व मास्कचा वापर करून लाभार्थी लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. काढा वाटपाचा लाभ पाचशे कुटुंबीयांनी घेतला .
