आळतेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसतोड रोखली

हातकणंगले / प्रतिनिधी :
    आळते (ता. हातकणंगले ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चिपरी येथील श्री . अंबाई खांडसरी यांच्या वतीने सुरु असलेली ऊसतोड रोखली. यावेळी ऊस वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर अडवून टायरमधील हवा सोडली. १५ ऑक्टोंबर पर्यंत ऊसतोड बंद करण्याची सक्त ताकीद देऊन पुन्हा ऊस तोड सुरु केल्यास पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करणार असल्याचा दम दिला.
    गेल्या दोन दिवसापासून आळते गावामध्ये वडगाव – हातकणंगले मार्गावर श्री. अंबाई खांडसरीच्या वतीने ऊसतोड सुरू होती . ही माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी कार्यकर्त्यासह तात्काळ धाव घेऊन ऊस वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर अडवून टायर मधील हवा सोडली . कोणाचेही नुकसान होऊ नये . या उद्देशाने संबंधित ट्रॅक्टर मालकाला व ऊसतोड कामगारांना समज दिली . तसेच १५ ऑक्टोबर पर्यंत मुख्यमंत्र्यांनी ऊसतोड करू नये असे आदेश दिले आहेत . व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद १५ ऑक्टोंबरला आहे . त्यानंतर शेतकरी संघटनेचा ऊसतोडी बाबत निर्णय झाल्यानंतरच ऊसतोड सुरू करण्याचे आदेश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले. पुन्हा ऊसतोड सुरू केल्यास पोलीस ठाणेत तक्रार दाखल करण्याचा दम दिला .

फोटो ओळ -ऊस वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर अडवून टायरमधील हवा सोडताना संघटनेचे कार्यकर्ते …

    यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे , हातकणंगले तालुकाध्यक्ष आप्पासाहेब एडके , धनाजी पाटील (सावर्डे ) , अमित पाटील (मजले ) , आप्पा मगदूम (किणी ) , शिवाजी पाटील (खोची ) यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते .

 

 

error: Content is protected !!