इचलकरंजी जेष्ठ नागरीक संघाच्यावतीने पाणपोईचे उद्घाटन

इचलकरंजी जेष्ठ नागरीक संघाच्यावतीने दत्तवाड, ता. शिरोळ येथे पाणपोई सुरु करण्यात आली. याचे उद्घाटन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रकाश रावळ यांच्या हस्ते करण्यात आले. इचलकरंजी जेष्ठ नागरीक संघ व अपंग संस्थेचे संस्थापक भाऊसो चौगुले फोटोग्राफर, अध्यक्ष धोंडीराम धुमाळे, सचिव बंडा परिट यांच्या पुढाकाराने ही पाणपोई सुरु करण्यात आली. दत्तवाड येथील गणेशमंदिर व मारुती मंदिर या दोन ठिकाणी या पाणपोई सुरु करण्यात आल्या आहेत. यावेळी महादेव स्वामी, इब्राहीम मांगुरे, विरुपाक्ष गदाळे आदी उपस्थित होते. दत्तवाड उज्वल महिला बहुउद्देशीय संस्थेचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!