मँचेस्टर नगरीबरोबरच आता ‘एमएच 51’उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व आयजीजीएचरुग्णालय नुतनीकरणाचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन


महाराष्ट्राचे मँचेस्टर आणि कबड्डी-खोखो ची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वस्त्रनगरी इचलकरंजीची आता ‘एमएच 51‘ अशी आणखीन एक ओळख झाली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यासाठी मंजूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आयजीजीएच) नुतनीकरण असा संयुक्त सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.
कोरोची येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न महिला सशक्तीकरण अंतर्गत आयोजित कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि आयजीजीएच रुग्णालय नुतनीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन आणि कोनशिला अनावरण करण्यात आले. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर, विधानपरिषद सभापती निलम गोर्‍हे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, रोहित काटकर आदी उपस्थित होते.
इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुका व परिसरातील वाहनधारकांना वाहन पासिंगसाठी कोल्हापूर येथे ये-जा करण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहता आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीतच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु होण्यासह इचलकरंजीसाठी स्वतंत्र एमएच 51 असा नोंदणी क्रमांक मिळण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळून राज्य शासनाने विशेषत: मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालया सुरु करण्यासाठी मंजूरी दिली. हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय शहापूर येथील विश्रामगृह येथे उभारण्यात येत आहे.
याचबरोबर इचलकरंजी परिसरासह सीमाभागातील नागरिकांसाठी आधारवड असलेले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इमारतीचे व स्टाफ निवासस्थानाचे नुतनीकरणासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी उपलब्ध केला असून त्यातूनच रुग्णालयाचे रुपडे पूर्णत: पालटत आहेत. निधीतून याठिकाणी आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सुविधा, यंत्रणा उपलब्ध करुन दिली जात आहे. सर्वच आजारांवर याठिकाणी उपचार मिळत असल्याने गोरगरीबांना हे रुग्णालय मोठा आधार बनले आहे. या रुग्णालयाच्या नुतनीकरणाचेही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाबरोबरच विश्रामगृहाच्या नुतनीकरणासाठी निधी उपलब्ध करुन दिला असून या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाल्याने आता नवीन वाहनांना एमएच 51 असा नवीन नोंदणी क्रमांक मिळणार आहे. तर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होणार असून येथे येणार्‍या कोणताही रुग्ण औषधोपचार किंवा यंत्रणा नाही म्हणून परत जाणार नाही असा विश्‍वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे श्री. आवाडे यांनी सांगितल

error: Content is protected !!