न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, रेंदाळ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

    न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, रेंदाळ येथे 76 स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सरपंच सौ .सुप्रिया पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. उपसरपंच मा.श्री .अभिषेक पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. तर विद्यालयाचे यावर्षी सेवानिवृत्त होणारे ग्रंथपाल श्री.देसाई ए .व्ही. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल तसेच रेंदाळ हायस्कूलच्या स्काऊट गाईड, आर एस पी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली.
    विद्यालयाचे शिक्षक विक्रम कोरवी यांच्या माध्यमातून 25 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.


    याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. व्ही.जी. पाटील. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक, ग्रामस्थ व विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होते.

error: Content is protected !!