जंबुकुमार देवाप्पा हुल्ले प्राथमिक विद्या मंदिर मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

    जंबुकुमार देवाप्पा हुल्ले प्राथमिक विद्या मंदिर रुई येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत शाळेत तीन दिवस ध्वजारोहण व ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाले.

    कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष व सदस्य अविनाश हुल्ले व पालक यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या दिवशी शाळेच्या अध्यापिका सौ.दिपाली कुरुंदवाडे , दुसऱ्या दिवशी शाळेच्या अध्यापिका सौ. वंदना कोल्हापुरे आणि तिसर्या दिवशी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती. कल्पना अजित हुल्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


    तीन दिवसाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत शाळेत देशभक्ती आधारित नृत्य, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, देशभक्ती गीत सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या अध्यापिका सौ. सारिका माणगावे ,प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.नितीन चौगुले,आभार अध्यापिका सौ स्मिता उपाध्ये.कार्यक्रमाचे आयोजन सौ. विद्या कुडचे यांनी केले.

error: Content is protected !!