खाजगी क्लासेसचा बेफिकीरपणा , नगर पालिकेची दंडात्मक कारवाई ; शहरात खळबळ

इचलकरंजी / प्रतिनिधी

    इचलकरंजी शहरातील तांबे क्लासेसच्या श्रद्धा इन्स्टिट्यूट व कॉलेजला नगरपालिकेने  दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.
तांबे क्लासेसच्या श्रद्धा इन्स्टिट्यूट व कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची पायमल्ली केली जात असलेने नगरपालिकेने कारवाई केली. क्लासच्या या बेफिरपणामुळे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याचे नागरिकांतुन व पालकांतुन शंका व्यक्त केली जात आहे . तसेच क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची कोणतीही खबरदारी घेतली जात नव्हती.
   तसेच शहरामध्ये खाजगी क्लासेस ,शाळा व महाविद्यालयामध्ये कोवीड-19 च्या प्रतिबंधात्मक उपायांचे राजरोसपणे नियमांचे पालन केले जात नाही.
    इचलकरंजी नगरपालिकेचे भरारी पथक शहरातील जे नागरिक व व्यवसायिक नियमांचे भंग  करतील. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आरोग्य सभापती संजय केंगार यांनी सांगितले.

error: Content is protected !!