हातकणंगले येथील कोव्हिड काळजी केंद्राची पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका)

    पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज हातकणंगले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड काळजी केंद्राला भेट देवून पाहणी केली.

  सोबतच हातकणंगले तालुक्याचा आढावा घेतला. या ठिकणी गर्दी न होता कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होईल यासाठीचे योग्य नियोजन करावे तसेच लसीकरणासाठी निवारा उभा करण्यासंदर्भात यावेळी संबंधिताना सूचना देण्यात आल्या.

  यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, सभापती प्रदीप पाटील, हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरूण जानवेकर, तहसिलदार प्रदीप उबाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. विलास देशमुख आदी उपस्थित होते.लसीकरणासाठी निवारा उभा करण्यात यावा. गर्दी होणार नाही तसेच कोव्हिड प्रतिबंधक नियमांचे पालन होईल हे पहावे, अशी सूचना करून पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.

error: Content is protected !!