इस्लामपूरात भाजपचा आनंदोत्सव

इस्लामपूर/ ताः ५

        इस्लामपूर (ता.वाळवा ) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अयोध्येतील रामजन्मभुमी शिलान्यास भूमीपूजनाचे औचीत्य साधून लाडू व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. वाळवा पंचायत समिती विरोधीपक्ष नेते राहुल दादा महाडीक, महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य सम्राट बाबा महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती.

     राहुल महाडीक म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे.बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला राम जन्म भूमिवरील मंदीराचा प्रश्न भाजपा सरकारने निकालात काढून त्याचे ऐतिहासिक भुमी पुजन करून सर्व भारतीयांच्या भावनेचा आदर केलेला आहे.

       सम्राट महाडीक म्हणाले, केंद्र सरकारने बरेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेले आहेत त्याचबरोबर जनतेने भाजपावरती जो विश्वास दाखवलेला आहे . त्या विश्वासास पात्र राहुन भाजप सरकार देशात रामराज्य आणेल. राममंदिरविषयी आम्ही खुप समाधानी आहोत . मंदिर म्हणजे  भारताची जागतिक ओळख होईल. यात काही शंका नाही. 

इस्लामपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने लाडू व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करताना राहुल महाडिक, सम्राट महाडिक व अन्य मान्यवर कार्यकर्ते…..

      यावेळी माजी नगरसेवक सतीश महाडीक, मा . नगरसेवक कपिल ओसवाल,मा . नगरसेवक एल.एन शहा,नगरसेवक अमित ओसवाल,नगरसेवक चेतन शिंदे,जलाल मुल्ला,राधेय शहा,अमोल जौंजाळ,सुर्याजी पवार,शितल कराडे,अमोल ठाणेकर, यश माळी, हेमंत राऊत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

error: Content is protected !!