जय हनुमान शेतकरी परिवर्तन सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात

हातकणंगले /प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील जय हनुमान सहकारी पाणी पुरवठा संस्था सावर्डे, नरंदे या संस्थेच्या सन २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणुकीच्या जय हनुमान शेतकरी परिवर्तन सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ हनुमान मंदिर सावर्डे व नागनाथ मंदिर नरंदे येथे करण्यात आला.

संस्था सभासदांच्या मालकीची असून सभासदांच्या हितासाठी आम्ही हा परिवर्तन लढा उभा केला आहे. भविष्यात सभासदांना योग्य मोबदल्यात पुरेसा पाणी पुरवठा केला पाहिजे. असे मत प्रचार शुभारंभ प्रसंगी सरदार पाटील यांनी व्यक्त केले.
सुदाम इंगवले, बाबासो पाटील, मधुकर चौगुले, सुशांत चव्हाण, सागर चव्हाण, चेतन थोरवत, धनाजी शिंदे, बंडू चव्हाण, बाबासो वळीवडे, शिवाजी मिसाळ, आण्णासो पाटील, श्रीपती चव्हाण, विनायक सावर्डेकर, विष्णुपंत कुलकर्णी, सरदार मगदूम, बाबासो चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला.
संपतराव चव्हाण, सुनील कुरणे यांच्यासह अनेक सभासदांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!