पारगाव /ता: ७
झर्ये (ता.राजापूर रत्नागिरी ) येथील एकतीस वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून सुमारे वर्षभर बलात्कार करून फसवणूक केलेल्या जाखले (ता.पन्हाळा) येथील तरूणावर कोडोली पोलीस ठाणेत गुन्हा दाखल झाला आहे . भरत रघुनाथ पाटील असे पोलीसांनी अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत कोडोली पोलीसातुन मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी तरूणी व आरोपी भरत यांची एप्रिल २०१९ पासून एकमेकास ओळखत आहेत. तेव्हापासुन भरत याने आजअखेर पर्यंत वेळोवेळी विरार-मुंबई, फणसगाव (ता.देवगड), जाखले,केखले,कोडोली परिसरात लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक सबंध ठेवुन बलात्कार केला,तसेच फिर्यादी तरुणी कडून वेळोवेळी अंदाजे एक लाख रू.रोख रक्कमेसह अडीच तोळे सोन्याचे दागिने घेवुन या तरूणीची फसवणूक केली आहे.फिर्यादी तरूणीसोबत भरत याने राहुन वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवुन गरोदर राहिलेवर तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देवुन गर्भपात करून तिला मारण्याची धमकी दिलेने समक्ष पोलीस ठाणेत हजर राहून सोमवारी राञी उशिरा फिर्यादी तरूणीने फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे स . पो. नि. सुरज बनसोडे करीत आहेत.