जयसिंगपुरात जनता कर्फ्यू लागू करा -जयसिंगपूर मर्चंट असोसिएशन व व्यापारी संघटनांची मागणी ; उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांना निवेदन

जयसिंगपूर/ता.६-प्रतिनिधी

  जयसिंगपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्ण संख्या 481 वर पोहोचली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जयसिंगपूर शहरात जनता कर्फ्यू करावा, अशी मागणी  जयसिंगपूर मर्चंट असोसिएशनच्यावतीने नगरपालिकेकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन उपनगराध्यक्ष संजय पाटील -यड्रावकर यांना देण्यात आले आहे.

  निवेदनात म्हटले आहे की, जयसिंगपूर शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व संस्था व आस्थापना यांची संस्थेच्या कार्यालयात बैठक घेवून चर्चा करण्यात आली आहे . तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जयसिंगपूर बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता प्रशासनाने जयसिंगपूर जनता कर्फ्यूसाठी सहकार्य करावे. असे आवानही या निवेदनात करण्यात आले आहे.
  निवेदनावर जयसिंगपूर सराफ असोसिएशन, कापड व्यापारी असोसिएशन,स्टेशनरी बुकसेलर असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, इलेक्ट्रीक असोसिएशन, इलेक्ट्रानिक्स असोसिएशन, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, प्लायवूड ग्लास असोसिएशन, जयसिंगपूर शहर खोकी व हातगाडीधारक सेवा भावी संस्था पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत. निवेदनाची प्रत संघटनेने मुख्याधिकारी यांनाही दिली आहे .
 यावेळी उपनगराध्यक्ष संजय पाटील -यड्रावकर यांनी नगरसेवकांची बैठक घेवुन व सर्व संबंधितांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन दिले.

error: Content is protected !!