जनसुराज्य पक्षाच्या खजिनदारपदी प्रदीप देशमुख यांची निवड

पारगाव /ताः ६

           प्रदीप राजाराम देशमुख

        पारगाव ( ता. हातकणंगले ) येथील प्रदीप राजाराम देशमुख यांची जनसुराज्य शक्ती पक्षाच्या खजिनदार पदी निवड करण्यात आली आहे . माजी मंत्री व जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयराव कोरे यांनी निवडीचे पत्र दिले आहे .
         देशमुख यांनी हातकणंगले पंचायत समितीचे उपसभापती पद भुषविले असुन ते वारणा दुध संघाचे संचालक आहेत . तसेच श्री पाराशर दुध संस्था व श्री पाराशर हौसिंग सोसायटीचे चेअरमन आहेत . सहकारी संस्थांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे . त्यांच्याकडे चांगले संघटन कौशल्य व युवक कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्याने त्यांची पक्षाने खजिनदार पदी निवड केली आहे .त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या मानद संचालक पदी सुद्धा त्यांची निवड झाली आहे .

error: Content is protected !!