जय हनुमान दुध संस्थेच्या चेअरमनपदी सतिशकुमार चौगुले यांची निवड

सतिषकुमार चौगुले

नेताजी माने

हेरले /ता : ८

          मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील श्री जय हनुमान सह . दुध व्याव . संस्थेच्या चेअरमनपदी सतिशकुमार चौगुले तर व्हा . चेअरमनपदी नेताजी माने यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली . सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन बाळासो थोरवत होते .
        यावेळी बाळासो चौगुले , महादेव शिंदे , जयवंत चौगुले , सुरेश कांबरे , निवास शेंडगे , सुनिल सुतार , श्रीकृष्ण थोरवत , शकील हजारी , महादेव चौगुले सुभाष मुसळे , सचिव आण्णासो पाटील , यांच्यासह संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक आणासो पाटील यांनी केले तर आभार सतिशकुमार चौगुले यांनी मानले .

error: Content is protected !!