दत्तवाडच्या पॉझिटिव्ह रुग्णाचा जयसिंगपूरात उपचारादरम्यान मृत्यू ;जयसिंगपुरात दोन नविन पॉझिटिव्ह ;

जयसिंगपूर /ताः ३१ प्रतिनिधी

        शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावचा पॉझिटिव्ह रुग्णाचा जयसिंगपुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जयसिंगपूरात शुक्रवारी दिवसभरात दोन नवीन रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दत्तवाड येथील ७३ वर्षांचा एक इसम जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होता.त्या रुग्णांच्या कुटुंबाला येथील मोदी हॉस्पिटलमध्ये अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.दोन दिवसांपूर्वी या इसमाचा मृत्यू झाल्याची खोटी माहीती या कुटुंबाला मिळाल्यानंतर या कुटुंबांनी अलगीकरण कक्षातून बाहेर येऊन आक्रोश केला होता. यावेळी जयसिंगपूर पोलीस व काही नगरसेवकांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत घालुन असा प्रकार घडला नसल्याचे खात्री पटवून दिली होती . मात्र शुक्रवारी सकाळी या रुग्णाचा त्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

        शहरातील बारावी गल्लीमध्ये एक रुग्णाचा अहवाल पॉजिटिव्ह आला . या ठिकाणी प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर करून बॅरिकेट व सॅनिटायझर औषध फवारणी करण्यात आली. या रुग्णांच्या प्रथम संपर्कातील एकूण पाच जणांना तर गल्ली क्रमांक तीन मध्ये आढळलेल्या रुग्णांच्या प्रथम संपर्कातील तीन अशा एकूण आठ जणांना तपासणी करीता पाठवण्यात आले आहे.
जयसिंगपूर शहरात आता एकूण ८९ रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी ११ रूग्ण | निगेटीव्ह रिपोर्ट आलेने त्यांना डिस्चार्च होऊन परत आलेत. सध्या ७५ जण उपचार घेत आहेत.तर तीन व्यक्ती मयत झाले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिली.

error: Content is protected !!