जयसिंगपूर / ताः ३
जयसिंगपूर शहरातील दोन पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. यामध्ये रविवारी रात्री गल्ली क्रमांक अकरा मधील 63 वर्षीय एक जण तर सोमवारी सकाळी गल्ली क्रमाक सहा जांभळे मळा मधील ४८ वर्षीय एक असे एकूण दोन जणांचा समावेश आहे. या दोघांच्यावर नगरपालिकेच्या वतीने उदगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे . तसेच राजीव गांधी नगर भागातील नव्याने एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ . खटावकर यांनी दिली.
जयसिंगपूर शहरांमध्ये आतापर्यंत एकूण १०१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून यापैकी काहीजण बरे होऊन परत आले आहेत.तर सहा जणांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी राजीव गांधी नगर भागातील आणखीन एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शहरांमध्ये वाढणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता घबराटीचे वातावरण पसरू लागले आहे. तर वैद्यकीय आणि नगरपालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडत आहे.