पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ जयसिंगपुर येथे शिवसेनेची निदर्शने

जयसिंगपूर / ताः ९-प्रतिनिधी

        कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने जयसिंगपुर येथील क्रांती चौकात सकाळी साडेअकरा वाजता वाजता कर्नाटक सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात
      यावेळी तालुकाप्रमुख सतिश मलमे , ज्येष्ठ शिवसैनिक आण्णासाहेब बिलोरे , महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगल चव्हाण , सभापती सौ कविता चौगुले , तालुकाप्रमुख रेखा जाधव संभाजीपूर ग्रामपंचायत सदस्य मनीषा पवार यानी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी जयसिंगपूर शहर प्रमुख अर्चना भोजणे, शाखाप्रमुख रंजना चौगुले,अँड. संभाजीराजे नाईक, सुरज भोसले, रतन परियार ,अरुण लाटवडे, धनाजी पवार ,संजय काळे, आकाश शिंगाडे , मंगेश चौगुले, शिवकुमार विभुते ,सुनील शिंदे , अरुण होगले, मनोज मलमे यासह शिवसैनिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                कर्नाटक सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करताना शिवसैनिक व शिवप्रेमी कार्यकर्ते …..

          यावेळी बोलताना तालुका प्रमुख सतीश मलमे म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ति गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसात सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना करावा . अन्यथा महाराष्ट्रातील शिवसैनिक शिवप्रेमी कर्नाटक राज्यात घुसून प्रतिष्ठापना सोहळा साजरा करतील असा इशारा दिला. यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाचा गजर केला. तर कर्नाटक सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
          त्यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, गोपनीय विभागाचे विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवघडे, अभिजीत भातमारे यांनी क्रांती चौकात चोक बंदोबस्त ठेवला होता.

error: Content is protected !!