जयसिंगपूर शहरालगतच्या गृहनिर्माण संस्था जयसिंगपूरमध्ये समाविष्ट होणार -प्र . नगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर ) ;नगरपरिषद सभेमध्ये झाला एकमुखी निर्णय

जयसिंगपूर /ता. १७- प्रतिनिधी

    जयसिंगपूर शहरालगत असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी जयसिंगपूर शहर हद्दीमध्ये आपल्या सोसायट्यांचा समावेश व्हावा . यासाठी नगरपरिषदेकडे मागणी केली होती . या विषयाबाबत नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने देखील नगरपालिकेकडे लेखी मागणी केली होती . त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी जयसिंगपूरचे प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी सोमवारी नगरसेवकांची एक दिवसीय तात्काळ ऑनलाइन सभा बोलावली होती .सभेमध्ये जयसिंगपूर शहरालगत असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना जयसिंगपूर शहरामध्ये समाविष्ट करून घेण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय सर्वानुमते पारित करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी बैठकीनंतर दिली आहे.
      शहरालगत असणाऱ्या डॉक्टर जे. जे. मगदूम हौसिंग सोसायटी, वीज कामगार गृहनिर्माण संस्था, महावीर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, पार्वती सहकारी गृहनिर्माण संस्था व सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थांनी त्यांच्या संस्थेकडील ठरावाद्वारे जयसिंगपूर नगरपरिषदेकडे जयसिंगपूर शहरांमध्ये सामावून घ्यावे . अशी लेखी मागणी केली होती . आम्ही वर्षानुवर्ष शहरालगत राहत असल्यामुळे सर्वार्थाने आम्ही शहराचा हिस्सा बनलो आहोत . परंतु आमच्या संस्था या ग्रामीण भागात नोंद असल्यामुळे आम्हाला गैरसोयीचे होत आहे, संस्थांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना शैक्षणिक, व्यापार, उद्योग व इतर सर्व व्यवहार करण्यासाठी जयसिंगपूर सोयीचे ठरत असल्याने आमच्या मागणीचा विचार करून आम्हाला जयसिंगपूर शहरामध्ये सामावून घ्यावे असे सोसायटी धारकांचे म्हणणे होते,
        नगरपरिषदेने घेतलेल्या आजच्या ऑनलाईन सभेमध्ये शहराच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आणि हद्दवाढ होत असल्याने या सर्व संस्थांना सामावून घेतल्यास नगरपरिषदेच्या हिताचे होईल . असे मत चर्चेत सहभागी झालेल्या सर्वच नगरसेवक नगरसेविकांनी व्यक्त केले आणि त्यानंतर या सर्व गृहनिर्माण संस्थांना जयसिंगपूर शहर हद्दीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला,
      मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी, यांच्यासह नगरसेवक असलम फरास, संभाजी मोरे, बजरंग खामकर, शिवाजी कुंभार, शितल गतारे, सर्जेराव पवार, राहुल बंडगर, संगीता चिंचवाडकर, दीपा झेले, स्वरूपा पाटील- यड्रावकर, शिवाजी कुंभार, मुक्ताबाई वगरे, पराग पाटील, सोनाली मगदूम, गणेश गायकवाड, अलका पाटील, रेखा देशमुख, अनुराधा आडके, महेश कलकुटगी, आसावरी आडके, प्रेमला मुरगुंडे, संजय पाटील कोथळीकर, सुलक्षणा कांबळे, युनूस डांगे, सौ. कलकुटगी या सर्वांनी सभेत सहभाग घेतला.

error: Content is protected !!